न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या विद्यालयात जयदीप एज्युकेशन सोसायटी उंब्रज नंबर 1 या संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मालतीताई हांडे मॅडम, संस्थेचे सचिव श्री संदीप शेठ मोडवे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धोत्रे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.