॥श्रम हाच देव ॥
"एक पुस्तक ,एक पेन, एक मुल आणि शिक्षक जग बदलू शकतात."
- मलालायुसूफजई .
नूतन माध्यमिक विद्यालय हिरडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर हे विद्यालय सन 1998 पासून सुरू झाले असून "श्री नागनाथ मंदिर" हे गावचे ग्रामदैवत असून त्याचा 'क' वर्गामध्ये समावेश झालेला आहे गावची लोकसंख्या सर्वसाधारण 3000 असून इयत्ता सातवी पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय होती व विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी या विद्यालयाची स्थापना करण्यात आली व गेली वीस वर्षापासून शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असून इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा व गुणवत्ता विद्यालयाने कायमस्वरूपी टिकून ठेवले आहे , त्यामुळे परिसरात विद्यालयाचा नावलौकिक झाला आहे .