माळरानावर राहणाऱ्या तसेच बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार शिक्षण घेता येत नसलेल्या मुला-मुलींना चाांगले शिक्षण घेता यावे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे. यासाठी आमचे सांस्थापक अध्यक्ष श्री. नागनाथ (आण्णा) चव्हाण यांनी, तेलंगवाडी तालुका मोहोळ जि. सोलापूर या ठीकाणी, विकासरत्न कै. नामदेव बाबुराव चव्हाण विद्यालय, २००९ ला सुरु केले. ही शाळा वाडी-वस्तीवर राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त असल्याने परिसरातील तसेच वाडी-वस्तीवरील विद्यार्थी सुंदर असे सर्वांगीण शिक्षण घेत आहेत.